#HBD : राधिका आपटे 

अभिनेत्री राधिका आपटे हिचा आज ३३ वा वाढदिवस आहे. ७ सप्टेंबर १९८५ रोजी राधिकाचा जन्म तामिळनाडूच्या वेल्लोर शहरात झाला. परंतु, तिचे बालपण पुणे शहरात गेले. राधिकाने अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतली आहे.

 २०१३ मध्ये राधिका आपटे ब्रिटिश संगीतकार बेनडीक्ट टेलर याच्यासोबत विवाहबद्ध झाली.

अभिनय क्षेत्रात आवड असल्याने कॉलेज लाइफपासून राधिकाने अनेक नाटके केली आहे. शाहिद कपूरच्या ‘वाह! लाईफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून राधिकाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. राधिकाला खरी ओळख २००९ मधील ‘अंतहीन’ या बंगाली चित्रपटातून मिळाली. राधिकाने हिंदीसहित मराठी, तामिळ, बंगाली, मल्याळम अशा अनेक भाषांमधील चित्रपटातअभिनय केला आहे.

‘समानांतर’ या चित्रपटातून राधिकाने मराठी चित्रपटसृष्टीत पाय ठेवला. २०१५ मध्ये लागोपाठ प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांतील राधिकाच्या भूमिकेची समीक्षकांनी प्रशंसा केली. हंटरर, मांझी द माउंटन मॅन, बदलापूर, आय एम, शोर इन द सिटी यासारख्या अनेक चित्रपटात तिने अभिनय केला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘पॅडमॅन’ या चित्रपटाने तिला लोकप्रियता मिळवून दिली.  रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या चित्रपटातील राधिका आपटेची भूमिकाही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली.

सध्या राधिका आपटे वेब सिरीजमध्ये काम करत असून तिच्या सॅक्रेड गेम्स, लस्ट स्टोरीज, घोल यामधील भूमिकाही चांगल्या गाजत आहेत.

याशिवाय राधिका आपटे अनेक वक्तव्यांमुळेही चर्चेत राहिली आहे. #मी टू या कॅम्पेनमध्ये राधिकाने तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभवही शेअर केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)