#HBD बिग बी : अमिताभ बच्चन ते बॉलिवूडचे शहेनशहा प्रवास 

बॉलिवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा आज ७६ वा वाढदिवस. चार दशकाहून अधिक काळ अमिताभ बच्चन यांनी सिनेरसिकांच्या मनावर राज्य केले आहे. १८० हुन अधिक चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या व बॉलिवूडचे शहेनशहा बनले.

उत्तर प्रदेशस्थित अलाहाबादमध्ये ११ ऑक्टोबर १९४२ रोजी हिंदी जगतातील प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांच्या घरी अमिताभ यांचा जन्म झाला. सुरुवातीला त्यांचे नाव इंकलाब ठेवण्यात आले होते. परंतु, वडिलांचे मित्र सुमित्रानंदन पंत यांच्या म्हणण्यावरून त्यांचे नाव अमिताभ ठेवण्यात आले. अमिताभ यांनी सुरुवातीला आकाशवाणीत नोकरीसाठी अर्ज केला होता. परंतु, अमिताभ यांच्या आवाजावरून त्यांना रिजेक्ट करण्यात आले. नंतर हाच आवाज त्यांची ओळख बनली.

-Ads-

अमिताभ यांनी पहिल्यांदा ‘सात हिंदुस्थानी’ (१९६९) चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. परंतु, या चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. अमिताभ यांना खरी ओळख मिळाली ती ‘जंजीर’ या चित्रपटातून. या चित्रपटाने त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. यानंतर त्यांनी अभिमान, सौदागर, चुपके चुपके, दीवार, शोले, कभी कभी, अमर अकबर एंथनी, त्रिशूल, डॉन, मुकद्दर का सिकंदर, मि. नटवरलाल, लावारिस, सिलसिला, कालिया, सत्ते पे सत्ता, नमक हलाल, शक्ति, कुली, शराबी, मर्द, शहंशाह, अग्निपथ, खुदा गवाह, मोहब्बतें, बागबान, ब्लैक, वक्त, सरकार, चीनी कम, भूतनाथ, पा, सत्याग्रह, शमिताभ यांसारखे एका पेक्षा एक हिट चित्रपट दिले आणि महानायक बनले.

अमिताभ यांना करियरमध्ये अनेक पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)