#HBD जुही चावला : जाणून घ्या तिच्याबद्दल सर्वकाही

हिंदी चित्रपटातील रोमँटिक, इमोशनल आणि  कॉमेडी अभिनयासाठी प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला आज ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे.  त्यांच्या जन्म हरयाणा मधील आहे.

१९८४ ला मिस इंडियाचा किताब मिळवला तसेच यानंतर हिंदी आणि  दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम सुरु  केले.

-Ads-

आजही प्रेक्षक हम है राही प्यार के, डर  ,बोल राधा बोल, दरार, यस बॉस, गुलाब गँग यांसारख्या चित्रपटामधील तिच्या अभिनयाला दाद देतात.

जुहीने  यांनी अभिनयाबरोबरच  फिर भी दिल है हिंदुस्थानी, अशोका, चलते चलते या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

जुहीचे पती जय मेहता हे प्रसिद्ध इंडस्ट्रीयालिस्ट असून त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत.जुहीला अभिनयाबरोबरच शेती करायला आवडते. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील वाडा येथे त्यांची  शेतजमीन असून तिथे त्या  शेती करतात. लोकांनी ऑर्गनिक खाद्यपदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा याकडे तिचा कल असतो.

गेल्या सात वर्षांपासून त्यांच्या शेतीमध्ये चिकू, पपई, डाळींब पिकवली जातात, तसेच २०० हून अधिक आंब्यांची झाडे  आहेत. याचबरोबर  मांडवा येथील शेतजमिनीमध्ये भाज्या पिकवल्या जातात. त्यांच्या पतींचे अनेक रेस्टॉरंट असून तिथे भाज्या याच शेतातून जातात.

चावला या बरेचदा मुलाखतीत सांगतात की, तुम्ही एकदा ऑर्गेनिक फळं, भाज्या खायला लागलात की बाजारात मिळणाऱ्या केमिकल मिश्रीत भाज्यांना  पूर्णपणे विसरून जाल याची मला खात्री आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)