#HBD : गानसम्राज्ञी आशा भोसले

आशा भोसले संगीत जगतातले एक असे नाव ज्याला कोणीच विसरू शकत नाही. आपल्या आवाजाच्या जादूने आशा भोसले यांनी जगभरात आपली वेगळी अशी एक ओळख बनवली. तब्बल १६ हजारांपेक्षा जास्त गाण्यांसाठी पार्श्वगायन केलेल्या आशाताई भोसले आज ८५ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

८ सप्टेंबर १९३३ साली आशाताईंचा जन्म प्रसिद्ध संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या घरात झाला. संगीतकाराच्या घरातील जन्म असल्याने संगीताचे धडे त्यांना घरातूनच मिळाले. वडील दीनानाथ आणि लता मंगेशकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत आशा भोसले यांनीही पार्श्वगायन करण्यास सुरुवात केली.

आशाताईंच्या कारकिर्दीची सुरुवात १९४३ सालापासून झाली. ‘माझा बाळ’ (१९४३) या मराठी चित्रपटात आशाताईंनी पहिल्यांदा पार्श्वगायन केले. तर बॉलिवूडमधील त्यांचे पहिले गाणे ‘चुनरिया’ चित्रपटातील सावन आया यासाठी त्यांनी आपला आवाज दिला. त्यांनी मराठी व हिंदीसहित बंगाली, गुजराती, पंजाबी, तामिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रुस या भाषेतही अनेक गाणी गायली आहेत. आशा भोसले यांनी ‘माई’ या चित्रपटात अभिनयसुद्धा केला होता.

नौशाद, ओ.पी. नय्यर, खैय्याम, रवी, एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन, शंकर-जयकीशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, उषा खन्ना, इलियाराजा, ए.आर. रेहमान आणि अशा इतरही संगीतकारांसह आशा भोसले यांनी काम केले आहे. आशा भोसले याना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांना दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार, आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

उडे जब जब जुल्फे तेरी, पर्दे में रहने दो, पिया तू अब तो आ जा, दम मारो दम, दिल चीज क्या है, मेरा कुछ सामान अशी एक न अनेक गाणी आशाताईंनी आपल्या आवाजातून अजरामर केली आहेत. रेशमाच्या रेघांनी, बुगडी माझी सांडली ग ही  मराठी गाणी तर आजही मराठी प्रेक्षकांच्या मनामनात आहेत. चित्रपट संगीत, पॉप संगीत, गझल, भजन, कव्वाली, लोकगीते, भावगीते अशा विविध प्रकारच्या गाण्यांनी आशाताईंनी कानसेनांना तृप्त केले आहे.

आशाताईंचे पहिला विवाह गणपत राव यांच्यासोबत झाला होता आणि दुसरे लग्न त्यांच्यापेक्षा ६ वर्षांनी लहान राहुल देव बर्मन यांच्यासोबत झाला होता. आशाताईंच्या जन्मदिनानिमित्त त्यांचे चाहते सोशल मीडियावरून त्यांच्या उदंड आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

दैनिक प्रभाततर्फे आशाताईंना जन्मदिनाच्या शुभेच्छा… 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)