#HBD : अभिनेते-निर्माते अतुल कुलकर्णी 

अतुल कुलकर्णी मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव. अतुल कुलकर्णी आज आपल्या वयाची ५२ वर्षे पूर्ण करीत आहेत. सात भाषांमधील ७० अधिक सिनेमांमध्ये आपली छाप सोडणारे अतुल अभिनेत्यासोबत निर्मातेही आहेत.

अतुल कुलकर्णी मूळचे बेळगावचे असून त्यांचे बालपण सोलापुरात गेले. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. सुरुवातीला त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. परंतु मन न रमल्याने इंग्रजी साहित्यात आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. कॉलेजमध्ये शिकत असतानाच ते अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत होते.

कॉलेजमध्येच ‘नाट्य आराधना’ या ग्रुपमध्ये अतुल कुलकर्णी सहभागी झाले. दोन वर्षे पडद्यामागे काम केल्यानंतर अतुल कुलकर्णी यांना नट म्हणून रंगमंचावर काम करण्याची संधी मिळाली. यानंतर त्यांनी नवी दिल्लीस्थित नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा (NSD) या संस्थेत प्रवेश घेतला. येथेच त्यांची ओळख गीतांजली यांच्यासोबत झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत व पुढे प्रेमात झाले. २९ डिसेंबर १९९६ रोजी अतुल आणि गीतांजली पुण्यात विवाहबंधनात अडकले. खुपते तिथे गुप्ते या मराठी कार्यक्रमात त्यांनी त्यांची प्रेमकथा उलगडून सांगितली होती. या कार्यक्रमात ते म्हणाले, मी प्रेमात पडलो किंवा प्रेमात कसा अडकलो हे माझे मलाच पडलेले कोडे आहे. गीतांजलीसोबत माझा विवाह माझ्या घरच्यांनाही आश्चर्याचा धक्का होता.

अतुल यांना ‘हे राम’ (२०००) आणि ‘चांदनी बार’ (२००२) चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आत्तापर्यंत अतुल यांनी अनेक मानसन्मान प्राप्त केले. अतुल कुलकर्णी नेहमीच सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर आपल्या लेखांद्वारे आणि मुलाखतींमधून उघडपणे मते मांडतांना दिसतात. ‘हे राम’, ‘चांदनी बार’, ‘खाकी’, ‘पेज ३’, ‘रंग दे बसंती’, ‘वळू’, ‘नटरंग’, ‘पोपट’, ‘एका प्रेमाची गोष्ट’सारख्या हे त्यांचे गाजलेले चित्रपट. आगामी ‘सिंग्युलॅरिटी’ या सिनेमाद्वारे अतुल कुलकर्णी यांनी हॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. दरम्यान, ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात अतुल कुलकर्णी यांनी तात्या टोपेंची भूमिका साकारली असून लवकरच हाही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)