#HBDअक्षय – राजेश खन्ना यांच्याकडे काम मागण्यासाठी गेला होता…

आज अक्षय कुमारचा जन्मदिवस आहे. मागीलवर्षी त्याला ‘रुस्तम’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. परंतु, १९९० मध्ये जेव्हा त्याला पहिला चित्रपट मिळावा म्हणून तो राजेश खन्ना यांच्याकडे काम मागण्यासाठी गेला होता तेव्हा तर त्याला मिळाले नव्हते. ‘जय जय शिवशंकर’ हा तो चित्रपट होता ज्यात अक्षय ऐवजी चंकी पांडे याला संधी मिळाली होती.

याला नशिबाचा भागच म्हणावा लागेल की, अक्षय कुमार २००१ मध्ये राजेश खन्नाचा जावई झाला. अक्षय आणि ट्विकंल खन्ना यांच्या विवाहाला १६ वर्षे झाली असून त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मुलाचे नाव आरव आणि मुलीचे नाव नितारा आहे. लग्नानंतर ट्विकंलने आपल्या अभिनय कारकिर्दीला राम- राम केलेला आहे. ट्विकंल सध्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपली नवीन खेळी साकारत आहे.
यंदाच्या वर्षात अक्षय कुमार अक्षय कुमारचे ‘पैडमैन’ आणि ‘गोल्ड’ ही सिनेमे रिलीज झाले आहेत. त्या दोन्ही सिनेमांनी चांगली कमाई केली आहे. अक्षयचा आगामी चित्रपट हा सुपरस्टार रजनीकांत सोबत रोबोट चित्रपटाचा दुसरा भाग ‘२.०’ येत आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)