आरक्षणावर कायमस्वरूपी तोडगा निघावा – नेने

पुणे- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काही जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, साठ वर्षानंतरही यामध्ये बदल झाला नसून याउलट प्रवाहातील जाती आरक्षणासाठी रस्त्यावर येत आहेत. आज अनेक समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत असून आरक्षणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असल्याचे मत, सामाजिक कार्येकर्ते शशिकांत नेने यांनी व्यक्त केले.

भारत इतिहास संशोधक मंडळ सभागृहात “आरक्षण – रेल्वे, जमिनींचे, शिक्षणाचे आणि पैशांचे’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. नेने म्हणाले, भारतामध्ये 6 हजार जाती असून उपजातींची संख्याही जास्त आहे. ज्या समाजाला सरकारी नोकरीत प्रतिनिधीत्व मिळत नाही, अशांना प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी साठ वर्षापूर्वी आरक्षण देण्यात आले. मात्र, आज साठ वर्षानंतरही जाती पुढारताना दिसत नसून उलट अनेक समाज नव्याने आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहे. यात गैर काही नसून एक समाज रस्त्यावर उतरल्यामुळे आपल्यालाही ते मिळावे या भावनेने दुसरा समाज रस्त्यावर उतरत आहेत. मात्र, आरक्षणाच्या या मुद्‌द्‌यावर कायमस्वरुपी तोडगा निघणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे लागणार असल्याचेही नेने यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)