देशात ‘द्वेषातून घडणाऱ्या हल्ल्यांचा’ मन की बात मध्ये उल्लेख का नाही? सिब्बल 

नवी दिल्ली : काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला असून देशामध्ये वाढीस लागलेल्या द्वेषहल्ल्यांवर पंतप्रधानांनी साधलेले ‘जाणीवपूर्वक मौन’च अशा घटनांना खतपाणी घालत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
मोदीसरकारच्या काळामध्ये देशात दर महिन्याला अशा प्रकारच्या २८ घटना घडत असून स्वातंत्र्यउत्तर काळातील हि सर्वात मोठी आकडेवारी असल्याचा दावा देखील त्यांनी केला. अशा  द्वेषाच्या वातावरणामध्ये अफवांवर विश्वास ठेऊन जमाव असे गुन्हे करतो असे देखील त्यांनी म्हंटले. एरवी आपल्या वक्तृत्वामुळे सदैव प्रकाशझोतात असलेले मोदी या घटनांवर मात्र ‘सोईचे मौन’ साधतात, द्वेषातून घडलेल्या हल्ल्यांवर देखील मोदींनी ‘मन की बात’ करावी असा सूचक सल्ला सिब्बल यांनी  दिला.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)