भारतातील सत्ताधाऱ्यांच्या डोक्‍यात द्वेष आणि असहिष्णुता : राहुल गांधी

दुबई दौऱ्यात विविध घटकांशी साधला संवाद

दुबई: गेल्या साडे चार वर्षात भारतातील सत्ताधाऱ्यांच्या डोक्‍यातील केवळ द्वेष आणि असहिष्णुतेचेच दर्शन घडले आहे अशी टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. आपल्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आज आयएमटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले की भारताने आज पर्यंत अनेक कल्पनांना आकार दिला आहे आणि अनेक कल्पनांमधूनच भारत घडला आहे. दुसऱ्याचे ऐकणे हा सुद्धा एक महत्वाचा गूण आहे तो आजवर भारताने जपला होता. भारतासारख्या देशात आज भूकेच्या समस्ये सारखा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे त्यामुळे भारताला क्रिडाक्षेत्रासारख्या विषयांना प्राधान्य देणे अवघड आहे. मोदींचे नाव न घेता त्यांच्या राजवटीवर टीका करताना ते म्हणाले की गेल्या साडे चार वर्षात त्यांनी भारतात जातीधर्मांमध्ये विभागणी केली. असहिष्णुतेची संस्कृती जोपासली. भारतासारख्या देशात आजही आरोग्य विषयक सेवांना मोठी संधी आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

भारतातून बौद्धिक निर्यात ब्रेन ड्रेन मोठ्या प्रमाणात होत आहे ही 21 व्या शतकातील भारतातील मोठी समस्या आहे. लोक आता अधिक मोबाईल झाले आहेत. जिथे मोठ्या प्रमाणात संधी आहे तिकडे ते आकर्िर्षत होताना दिसताहेत. पण त्यांच्यासाठी आपण आपल्याच देशात संधी निर्माण करणार आहोत की नाही हा विषय आज महत्वाचा आहे. भारताच्या बॅंकिंग सिस्टीमलाही चांगला आकार देण्याची गरज आज निर्माण झाली आहे. बॅंकांमधील वित्ताचा उपयोग लघु आणि मध्यम व्यावसायिकांना झाला पाहिजे. तशी प्रभावी धोरणे आज आखण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

राहूल गांधी यांनी आज युएईचे उपाध्यक्ष आणि पंतप्रधान शेख मोहंमद बिन रशिद अल मक्तूम यांच्याशी चर्चा केली. भारत आणि युएई यापुढेही अधिक चांगले मित्र म्हणून कायम राहतील यासाठी आपण प्रयत्नशील राहु अशी ग्वाही त्यांनी यावेळी त्यांना दिली. काल त्यांनी या दौऱ्याच्या निमीत्ताने भारतीय व्यावसायिकांच्या संघटनेचे प्रतिनिधी आणि तेथील पंजाबी प्रतिनिधींशीही चर्चा केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)