दिल्लीतील पलवल मध्ये गुरढोरे चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीची हत्या

संग्रहित छायाचित्र.....

नवी दिल्ली – हरियाणाच्या पलवलमधील बहरोला गावात गुरे चोरी करण्याच्या आरोपावरून एका व्यक्तीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. गावातील स्थानिक नागरिकांनी चोरी करायला आलेल्या व्यक्तीला हात-पाय बांधून मारहाण केली. या मारहाणीमध्ये व्यक्ती इतका जखमी झाला की, त्याचा यामध्ये मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्तीला तीन नागरिकांनी हात-पाय बांधून खूप मारले. संबंधित मृत व्यक्ती ही आणखी दोघासोबत गुरांची चोरी करण्यासाठी आली होती, पण बाकीचे दोघेही पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ओळख आणि पोस्टमार्टम साठी जिल्हा रूग्णालयात पाठविला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी या घटनेसंबंधी तीन सख्या भावांच्या विरोधात केस दाखल करत चौकशी सुरू केली आहे. पोलीसांच्या सांगितल्यानुसार, शुक्रवारी रात्री बहरोला गावातील एका घरात एक चोर म्हैस चोरण्यासाठी आला होता. घरातील लोकांनी चोराला पकडून बांधले आणि खूप मारले. या मारहाणीत त्या चोराता मृत्यू झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)