सिद्धूना पाकिस्तानी एजंट म्हणणाऱ्या हरसिमरत बादल यांना सिद्धूच्या पत्नीकडून तिखट प्रतिउत्तर

शीख समुदायाचे श्रध्दास्थान असलेले पाकिस्तानातील करतारपूर कॉरीडोअर काही दिवसांपूर्वी भारतातील शीख बांधवांसाठी उघडे करण्यात आले होते. काँग्रेस नेते नवजोत सिद्धू यांनी करतारपूर येथे भेट देखील दिली होती तसेच शिखांसाठी या श्रद्धास्थानाचे दरवाजे उघडण्यासाठी प्रयत्न देखील केले होते. याबाबत नवजोत सिद्धू यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांसोबत आपण केलेल्या शिष्टाचारामुळेच पाकिस्तानातील करतारपूर कॉरीडोअर शिखांसाठी उघडे करण्यात आले असा दावा त्यांनी केला होता.

याबाबत बोलताना भाजपच्या हरसिमरत बादल यांनी सिद्धू यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांना पाकिस्तानी एजंट संबोधले होते. त्या म्हणाल्या होत्या की, “पाकिस्तानी एजंट असणाऱ्या सिद्धू यांनी पाकिस्तानातून परवानगी आणली हे खरे आहे मात्र भारतातून आमच्याच सरकारने यासाठी परवानगी दिली आहे. हे विसरू नये.”

आता या वादामध्ये सिद्धू यांच्या पत्नीने देखील उडी घेतली असून नवजोत कौर सिद्धू यांनी हरसिमरत यांना चांगलंच सुनावलं आहे. त्या म्हणतात, “हरसिमरत यांना असं बोलताना लाज वाटायला हवी होती. आम्ही याअगोदर देखील हे स्पष्ट केलं आहे की आम्हाला कोणत्याही श्रेयवादामध्ये पडायचं नाहीये. आम्ही आणि आमचे शीख बांधव मानतात की हे कॉरीडॉर उघडणं खुद्द गुरु नानकजी यांची इच्छा होती.”

https://twitter.com/ANI/status/1105791119571513344

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)