इंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’?

हर्षवर्धन पाटीलही काँग्रेससोडून भाजपात प्रवेश करणार?

इंदापूर : महाराष्ट्रातील काँग्रेसचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे देखील आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. सध्या राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची शिलेदार मानली जाणारी घराणी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशातच आता हर्षवर्धन पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त असल्याने काँग्रेसच्या गोटामध्ये अस्वस्थता पसरली आहे. तर दुसरीकडे एकापेक्षा एक मोठे राजकीय बॉम्ब फोडण्याचा भाजप नेत्यांचा दावा खरा ठरताना दिसत असल्याचे चित्र आहे.

असे असले तरी हर्षवर्धन पाटील यांच्याकडून भाजप प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडून हर्षवर्धन पाटील यांना बारामती लोकसभेची जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. स्वतः हर्षवर्धन पाटील अथवा त्यांच्या पत्नीने या जागेवरून निवडणूक लढवावी अशी गळ भाजपच्या नेत्यांकडून हर्षवर्धन पाटलांना घालण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

हे देखील वाचा : पुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)