हर्षद मेहताच्या भावाची निर्दोष सुटका 

मुंबई – स्टेट बॅंकेला 105 कोटी रूपयांना फसवल्याच्या प्रकरणातून अश्‍विन मेहता आणि अन्य आठ जणांची येथील न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. 1992 साली हर्षद मेहताचे जे प्रकरण गाजले होते त्यातील हे प्रकरण असून अश्‍विन मेहता हा हर्षद मेहताचा भाऊ आहे.

1992 च्या या प्रकरणांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. त्या न्यायालयाच्या न्यायाधिश शालिनी फणसळकर यांनी आज हा निकाल दिला. सरकारी पक्षाला यात आपला आरोप पुर्णपणाने सिद्ध करता आलेला नाही असा निष्कर्ष काढीत त्यांनी अश्‍विन मेहतासह सर्व नऊ जणांची निर्दोष मुक्तता केली. त्यात स्टेट बॅंकेच्या काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

मेहता बंधुंशी संगनमत करून बॅंकेला फसवण्याचा कट केला आणि त्यांनी बॅंकेची 105 कोटी रूपयांची फसवणूक केली असा त्यांच्यावर आरोप होता. या प्रकरणाचा सीबीआय मार्फत तपास करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी हर्षद मेहता याचे 2001 मध्ये निधन झाले. यात स्टेट बॅंकेच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यास जी अनुमती देण्यात आली आहे त्यातही त्रुृटी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)