‘हरमनप्रीत-मिताली’ वादात बीसीसीआयची मध्यस्थी

नवी दिल्ली – महिला विश्‍वचषक टी-20 स्पर्धेच्या उपान्त्य फेरीतील सामन्यात हरमनप्रीत कौरने अंतिम संघात अनुभवी मिताली राजला वगळले आणि त्या सामन्यात भारतीय फलंदाजांच्या अपयशामुळे भारताने तो सामना गमावला आणि संघाचे आव्हान उपान्त्य फेरीतच संपुष्टात आले.

त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या महत्वपूर्ण उपांत्य फेरीत मिताली राजसारख्या अनुभवी खेळाडूला वगळल्याने कर्णधार हरमनप्रीत कौरवर टीका झाली त्यातच मिताली राजच्या मॅनेजरनेही हरमनप्रीतवर बोचरी टिका करताना ती अपात्र कर्णधार आहे असे म्हणली होती. त्यानंतर हा वाद आणखिनच वाढण्याची शक्‍यता असताना बीसीसीआयने यात मध्यस्थी करण्याचे ठरविले असून बीसीसीआयची कमिटी मिताली राज, हरमनप्रीत कौर, प्रशिक्षक रमेश पोवार, मॅनेजर तृप्ती भट्टाचार्य आणि दौरा व्यवस्थापक सुधा शहायांची स्वतंत्र चौकशी करणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, संघ निवडी बाबद खेळाडूंच्या जाहिरात व्यवस्थापकांनी टिका करणे अयोग्य असून त्यामुळे संघातील वातावरण आणखिनच बिघडण्याची शक्‍यता असते. तसेच अश्‍या गोष्टींमुळे संघाची प्रतिमा देखिल खराब होते. तसेच अश्‍याप्रकारच्या वादांमुळे संघाची प्रतिमा देखिल डागालत आहे आणि त्याचा परिणाम संघाच्या प्रदर्शनावर होतो आहे. त्यामुळे बीसीसीआय लच्वकरच या वादाचा तोडगा काढेल तसेच या वादाची चौकशी देखिल केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, खेळाडूंच्या जाहिरात व्यवस्थापनाशी संबंधीत व्यकतींनी खेळाचे नियम आणि मर्यादा सांभाळूनच आपले काम करायला हवे जेनेकरुन त्या खेळाडूची अथवा खेळाची प्रतिमा डागाळणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)