Women’s WT20 2018 : हरमनप्रीत कौरच्या नावावर विक्रमाची नोंद

भारतीय महिला संघाने विंडीजमध्ये सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात न्यूझीलंडवर 34 धावांनी मात केली. या विजयात भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिचा मोलाचा वाटा उचलला. हरमप्रीतने न्यूझीलंडविरूध्द आपला पहिला सामना खेळत असतान शतक झळकावलं. या शतकाबरोबरच तिच्या नावे एका विक्रमाची नोंद झाली आहे.

हरमनप्रीत कौर ही टी20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तर महिलांच्या टी20 विश्वचषकामध्ये शतक झळकाविणारी तिसरी महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी मेन लँनिंग (126) आणि डाॅटिन (नाबाद 112) यांनी टी20 विश्वचषकामध्ये शतके झळकावली आहेत.

न्यूझीलंडविरूध्दच्या सामन्यात हरमनप्रीतने 51 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये 8 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)