धावण्यास त्रास होत होता म्हणून स्फोटक खेळी केली : हरमनप्रीत कौर 

भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने विंडीज येथे सुरु असलेल्या महिला टी-20 विश्‍वचषकातील पहिल्याच सामन्यात ऐतिहासीक केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध आपला पहिला सामना खेळत असताना हरमनप्रीतने सामन्यात शतक झळकावले असून तिचे हे शतक टी-20 सामन्यात भारतीय महिला संघाकडून पहिले शतक ठरले आहे. त्यामुळे टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

या खेळी विषयी आणि तंदुरुस्ती विषयी बोलताना हरमनप्रीत कौर म्हणाली, सकाळ पासूनच आज मला पाठदुखीचा त्रास होत होता. त्यात फलंदाजीस आल्यावर माझ्या पायाच्या बोटात थोड्या वेदना सुरु झाल्या. फिजिओने त्यावर उपचार केल्यावर थोडावेळ दिलासा मिळाला. पण नंतर पोटाचे स्नायू देखील दुखावू लागले. एकेरी-दुहेरी धाव घेण्यामुळे त्रास वाढेल आणि मोठे फटके मारल्याने पळणे कमी होईल, असे मला वाटले. त्यामुळे मी जेमीमाला सांगेतले की, मी धावण्यापेक्षा मोठे फटके खेळण्यावरच भर देणार आहे.

मोक्याच्यावेळी आपली कामगिरी उंचावण्याच्या लौकिकास सार्थ ठरविताना हरमनप्रीतने 51 चेंडूत नाबाद 103 धावांची वेगवान खेळी करताना संघाला 194 धावांची मजल मारून दिली. हरमनप्रीतच्या खेळीत 8 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. त्याच बरोबर मुंबईकर जेमिमा रॉड्रिक्‍झने हरमनप्रीतला 59 धावांची अर्धशतकी खेळी करुन चांगली साथ दिली. या सामन्यात तिची तंदुरुस्ती मोठा प्रश्न होती. सामन्याच्या सकाळपासूनच ती पाठदुखीने त्रस्त होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)