हरमनप्रीत कौर कर्णधारपदास अपात्र : अनिशा गुप्ता

मिताली राजच्या मॅनेजरचा गंभीर आरोप

नवी दिल्ली – महिला विश्‍वचषक टी-20 स्पर्धेतील उपान्त्यफेरीत भारतीय महिला संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर उपान्त्यसामन्यात संघात स्थान न मिळालेल्या मिताली राजला वगळण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यात मिताली राजची मॅनेजर अनिशा गुप्ताने अत्यंत कठोर शब्दात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर टीका केली असून यात तिने हरमनप्रीत कर्णधारपदास अपात्र असल्याचे बोचरे वक्तव्य देखिल तिने केले आहे.

मितालीला संघाबाहेर बसवण्याच्या निर्णयावर संतप्त झालेल्या अनिशाने हरमनप्रीतवर गंभीर आरोप केले आहेत. हरमनप्रीत कारस्थानी, खोट बोलणारी, अपरिपक्व आणि कर्णधारपदासाठी योग्य नसलेली व्यक्ती आहे अशा शब्दात ट्‌विटरवरुन तिने आपला राग व्यक्त केला. असून, या सामन्यात अनुभवी मिताली राजला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर जोरदार टीका होत आहे.

पण, कर्णधार हरमनप्रीत कौरने मितालीला बाहेर बसवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. हा निर्णय संघहित पाहून घेतला होता त्यामुळे या निर्णयाचा पश्‍चाताप नाही असेही तिने यावेळी सांगितले. याच्यावर मिताली राजची मॅनेजर अनिशा गुप्ताने ट्‌विट करुन हरमनप्रीतवर जोरदार टीका केली होती. नंतर ते ट्‌विट आणि अकाउंट दोन्हीही डिलीट करण्यात आले होते. मॅनेजर गुप्तांनी नंतर हे अकाउंट आणि ट्‌विट आपले असल्याचे सांगत आपल्या वक्तव्याचे समर्थनही केले होते.

मिताली राज या मालिकेत उत्तम फॉर्ममध्ये होती. स्पर्धेत दोन अर्धशतके झळकवणाऱ्या मितालीला सामनावीराचे दोन पुरस्कारही मिळाले होते. प्रकृती चांगली नसल्या कारणाने मिताली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात खेळू शकली नव्हती. मात्र, उपांत्यफेरीच्या लढतीत तीची प्रकृती ठणठणीत होती आणि ती या सामन्यासाठी उपलब्ध देखिल होती.

मात्र, महत्वाच्या सामन्यातच तिला वगळण्यात आले. त्याचा परिणाम इंग्लंडच्या प्रभावी माऱ्यासमोर भारताचा डाव अवघ्या 112 धावात संपुष्टात आला. भारताचे 113 धावांचे लक्ष्य इंग्लंडने आठ गडी राखून सहज पार करत विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)