राजस्थानात भाजपाला धक्का; भाजपा खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

जयपूर: राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे राजस्थानातील खासदार आणि माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी असलेल्या हरिशचंद्र मीना यांनी आज राजस्थानचे माजी मुख्यामंत्री अशोक गेहलोत आणि ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मीना यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भाजपाला मोठा धक्का बसला असल्याचे मानण्यात येत आहे. पोलीस महासंचालक पदावर कार्यरत असलेल्या हरिशचंद्र मीना यांनी २०१४ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. मीना यांनी २०१४ची लोकसभा निवडणूक दौसा येथून लढवत आपले मोठे बंधू तथा काँग्रेसनेते नमो नारायण मीना यांचा पराभव केला होता.

-Ads-

पूर्व राजस्थानात मीना समाजाचे चांगले वर्चस्व आहे. गेल्या महिन्यात जसवंत सिंग यांचे पुत्र मानवेंद्र सिंग यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर भाजपासाठी हा दुसरा मोठा धक्का समजला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
13 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
2 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
33 :blush: Great
0 :cry: Sad
24 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)