चौकीदारामुळे मी ‘बेरोजगार’ – हार्दिक पटेल

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या चौकीदार चोर है या घोषणेचा धसका घेत मैं भी चौकीदार ही मोहीम उघडली आहे. मात्र, गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते आणि नुकतेच कॉंग्रेसमध्ये सामील झालेले हार्दिक पटेल यांनी चौकीदार शब्दाला टक्कर देत ट्‌विटरवर आपल्या नावापुढे बेरोजगार असे लिहिले. त्यामुळे ट्‌विटरवर हार्दिक पटेल यांच नाव आता बेरोजगार हार्दिक पटेल असे झाले आहे. हार्दिक पटेल यांच्या या मोहिमेची ट्‌विटरवर जोरदार चर्चा सुरू आहे.

 

राफेल कराराच्या मुद्द्यावरून राहुल गांधी आणि कॉंग्रेस सातत्याने पतंप्रधान नरेंद्र मोदींवर चौकीदार चोर है असे म्हणत हल्लाबोल करत आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींनी शनिवारी सोशल मीडियावर मैं भी चौकीदार ही मोहीम उघडली होती. काही तासातच मैं भी चौकीदार हा हॅशटॅग ट्‌विटरवर ट्रेंड होत होता. तसेच इतर सोशल मीडियावरही या मोहिमेची चर्चा होती. मोदींसह देशातील दिग्गज भाजप नेत्यांनी ट्‌विटरवर आल्या नावापुढे चौकीदार लिहिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)