हार्दिक पटेलला उच्च न्यायालयाचा दणका; निवडणूक लढता येणार नाही

संग्रहित छायाचित्र..

नवी दिल्ली – गुजरात उच्च न्यायालयाने हार्दिक पटेलला निर्दोष मुक्त करण्याची याचिका फेटाळली आहे. यामुळे हार्दिक पटेल यांना लोकसभा निवडणूक लढता येणार नाही. अमरेली किंवा जामनगर मतदारसंघातून हार्दिक पटेल निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती.

हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये!

लोकसभा निवडणूक लढण्यासाठी हार्दिक पटेल यांनी काही दिवसापूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर हार्दिक पटेल यांना दणका बसला आहे.

पाटीदार आरक्षण हिंसा : हार्दिक पटेलला दोन वर्षाची शिक्षा

दरम्यान, हार्दिक पटेलवर 2015 मध्ये मेहसाणा दंगली प्रकरणी खटला सुरु आहे. कनिष्ठ न्यायालयाकडून हार्दिक पटेलला शिक्षाही सुनावण्यात आली होती. या निर्णयाविरोधात हार्दिक पटेलने हायकोर्टात आव्हान दिलं होतं, ज्यावर सुनावणीस नकार देत कोर्टाने निर्दोष मुक्त करण्याची मागणी फेटाळली. कोर्टाच्या या निर्णयामुळे लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार हार्दिक पटेलला निवडणूक लढता येणार नाही.

हार्दिक पटेलची याचिका फेटाळण्यापूर्वी त्याच्यावर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांनाही विचारात घेण्यात आलं. त्याच्यावर काही गंभीर गुन्ह्यांसह एकूण 17 एफआयआर दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)