हार्दिक पटेल यांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात केले दाखल

नवी दिल्ली – आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 14 दिवसांपासून बेमुदत उपोषणावर असलेले पाटीदार समाजाचे तरूण नेते हार्दिक पटेल यांची आज दुपारी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्न त्याग केल्याने काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडत असल्याच्या बातम्या माध्यमावर सतत येत होत्या.

हार्दिक पटेल यांनी काही वेळेसाठी पाणी पिणे सुध्दा सोडले होते. आज खोडलधाम ट्रस्टचे अध्यक्ष नरेश पाटील हे हार्दिक पटेल यांना भेटण्यासाठी आले होते. या मुलाखतीनंतर हार्दिक पटेल यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णलयात नेण्यात आले.

दरम्यान पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी अहमदाबादमधील त्यांच्या फार्महाऊसवरच  25 आॅगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हार्दिक पटेल यांना तेराव्या दिवशीच डाॅक्टरांनी त्यांची प्रकृती पाहता रूग्णलयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता.

राज्य सरकारने पाटीदार नेते हार्दिक पटेल यांच्याशी आरक्षणाविषयी बोलणी केली नाही, तर शुक्रवारी हार्दिक पटेलच्या समर्थनार्थ  24 तास उपवास ठेवला जाईल, अशी घोषणा गुजरात काँग्रेसने गुरूवारी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)