गुन्हे तर सत्ताधारी पक्ष्यांच्या नेत्यांवरही, कायदा फक्त आमच्यासाठी का ? – हार्दिक पटेल

नवी दिल्ली – गुजरात उच्च न्यायालयाने हार्दिक पटेलला निर्दोष मुक्त करण्याची याचिका फेटाळली आहे. यामुळे हार्दिक पटेल यांना लोकसभा निवडणूक लढता येणार नाही. अमरेली किंवा जामनगर मतदारसंघातून हार्दिक पटेल निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर हार्दिक पटेल यांना चांगलाच दणका बसला आहे. त्यामुळे हार्दिक पटेल यांचे लोकसभा निवडणूक लढण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

दरम्यान, हार्दिक पटेल यांनी गुजरात हायकोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच सत्ताधारी पक्ष संविधानविरोधात काम करत असल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘भाजपाच्याही अनेक नेत्यांविरोधात खटले सुरू आहेत, शिक्षा देखील झाली, पण कायदा फक्त आमच्यासाठीच आहे का? असा सवाल करत हार्दिक पटेल यांनी भाजपवर टीका केली आहे.

पुढे बोलताना हार्दिक पटेल म्हणाले की, ‘ मी घाबरणार नाही. सत्य, अहिंसा आणि प्रामाणिकपणे जनतेसाठी आवाज उठवणारच. जनतेची सेवा करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत आणणार आणि पक्षासाठी संपूर्ण गुजरातमध्ये प्रचार करणार. माझी चूक फक्त इतकीच होती की, भाजपासमोर मी झुकलो नाही. सत्ताधाऱ्यांशी संघर्ष केल्याचा हा परिणाम आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूक लढण्यासाठी हार्दिक पटेल यांनी काही दिवसापूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आजच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर हार्दिक पटेल यांना चांगलाच दणका बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)