पाटीदार आरक्षण : १९ दिवसानंतर ‘हार्दिक पटेल’ यांचे उपोषण मागे

अहमदाबाद – पाटीदार समाजाचे तरूण नेते हार्दिक पटेल यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, पाटीदार आरक्षण आणि राजद्रोह प्रकरणी कारागृहात असलेला साथीदार अल्पेश कथिरिया याच्या सुटकेच्या मागणीसाठी 25 आॅगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. गेल्या 19 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आज हार्दिक पटेल यांनी मागे घेतले आहे.

पाटीदार समाजाचे प्रमुख, धार्मिक संघटना उमिया धामचे प्रमुख प्रल्हाद पटेल, खोडलामचे अध्यक्ष नरेश पाटील आणि इतर सहा संघटनेच्या प्रतिनिधींचे समन्वयक सी के पटेल यांच्या हस्ते लींबू-पाणी, नारळ पाणी आणि पाणी घेत हार्दिक पटेल यांनी उपोषण मागे घेतले आहे.

उपोषण मागे घेताना हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे की, ‘माझ्या समााजातील ज्येष्ठांच्या शब्दाला मान देत मी त्यांच्यासमोर झुकलो आहे. मी सरकार समोर झुकलेलो नाही. समााजातील ज्येष्ठांच्या म्हणण्यानुसार मी उपोषण मागे घेतले आहे. समाजातील ज्येष्ठ सरकारशी आरक्षणाविषयी बोलणी करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)