मुंबई – क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. सोशल मीडियावरील कधी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो, तर कधी अनेक बॉलिवूडमधील अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडण्यात येतात.
यातच आतापर्यत उर्वशी रौतेला त्याचे नाव जोडण्यात आल्यानंतर आता अभिनेत्री नताशा स्टेनकोविक सोबत जोडण्यात येत आहे.दरम्यान, अभिनेत्री नताशा स्टेनकोविकसोबत रिलेशनशीपमध्ये आहे.
दोघेही गेल्या काही दिवसांपासून दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. नताशा आणि हार्दिकने दुबईमधील समुद्र किनाऱ्यावरील काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यापूर्वी उर्वशी रौतेला , परिणीती चोप्रा या बॉलिवूड स्टारसोबत रिलेशनशीपबाबतच्या चर्चा रंगल्या होत्या.