हार्दिक पांड्या, के. राहुलला ठोठाविला 20 लाखांचा दंड

नवी दिल्ली – ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी 20 लाखांचा दंड ठोठवला आहे. यातील 10 लाख हे शहीद निमलष्करी जवानांच्या कुटुंबीयांना, तर 10 लाख हे अंध क्रिकेटच्या निधीसाठी आणि त्याच्या प्रसिद्धीसाठी देण्याचे आदेश दिले आहेत.

या 20 लाख रूपयांच्या दंडाच्या रकमेतील 10 लाख कर्तव्य बजावताना शहीद झालेले निमलष्करी दलातील 10 जवान यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 लाख अशा प्रमाणे मदत निधी म्हणून दोघांनीही द्यावा. तसेच 10 लाख रुपये हे अंध क्रिकेटच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या संघटनेला मदत म्हणून द्यावा, असे आदेश लोकपाल डी के जैन यांनी दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हि रक्कम त्यांनी 4 आठवड्यांच्या आत जमा करायची आहे. जर ही दंडाची रक्कम त्यांनी दिलेल्या कालावधीत जमा केली नाही, तर बीसीसीआयला त्यांच्या सामन्याच्या मानधनातून ती रक्कम कापून घेण्याचे हक्क देखील लोकपाल यांनी दिले आहेत.

दरम्यान, महिलांबाबात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी या दोघांनाही बीसीसीआयने आस्ट्रेलिया दौऱ्यावरून परत बोलवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)