‘या’ कारणांमुळे हरभजन सिंग ‘संघ निवडसमिती’वर रागावला

नवी दिल्ली – आशिया चषकासाठी काही दिवसापूर्वीच भारतीय नियामक मंडळाने संघ जाहिर केला आहे. मात्र या संघनिवडीमुळे हरभजन सिंग चांगलाच संतापला आहे. भारताच्या फिरकीपटूने संघनिवडीवर प्रतिक्रिया देण्यास जरी उशीर केला असला तरी त्याने ट्विटवर ट्विट करत आपला राग व्यक्त केला आहे.

आपला राग व्यक्त करताना हरभजन याने ट्विटरवर सरळ-सरळ भारतीय संघ  निवडसमितीला प्रश्न विचारत म्हटले आहे की, ‘मयांक अग्रवाल कुठे आहे’? सगळ्यात जास्त धावा बनविल्यानंतरही मयांक अग्रवाल याचे नाव भारतीय संघात का नाही. मला वाटतं की वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे नियम आहेत.

दरम्यान कर्नाटकसाठी खेळणाऱ्या मयांक अग्रवाल याच्या निवडीची आशा यासाठी केली जात होती की, ‘इंग्लंड दौऱ्यात शिखर धवन आणि केएल राहूल हे चांगली कामगिरी बजाविण्यात अपयशी ठरले असताना त्यांची आशिया कपसाठी संघात निवड केली आहे’. घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असताना देखील जेव्हा मयांक अग्रवालची निवड करण्यात आली नाही तेव्हा हरभजन याने स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली.

हरभजनच्या नाराजीचे आणखी एक कारण म्हणजे ‘मागील घरगुती सत्रात मयांक हा दोन हजारापेक्षा अधिक धावा करणारा फलदांज ठरला होता. मयांक अजूनही चांगली कामगिरी करत आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात ‘भारताच्या अ संघा’कडून खेळताना मयांकने 4 सामन्यामध्ये 84.33 सरासरीने 287 धावा काढल्या होत्या. या मालिकेत मयांक हा सगळ्यात यशस्वी फलदांज म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. मयांकच्या या चांगल्या कामगिरीमुळे हरभजन याने हे ट्विट केल्याचे बोलले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)