#Happybirthday अभिनेत्री जेनेलिया डिसूजा-देशमुखचा आज वाढदिवस..!

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपाटातून आपल्या अभिनयाची छाप टाकणारी जेनेलिया देशमुख यांचा आज वादिवस. जेनेलिया यांना पती रितेश देशमुख यांनी वाढदिवसाच्या स्पेशल शुभेच्छा दिल्या आहेत. जेनेलिया यांनी तेलुगू , तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांतूनदेखील अभिनय केला आहे. २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाद्वारे जेनेलिया यांनी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या मस्ती, फोर्स, तेरे नाल लव्ह हो गया, अशा अनेक चित्रपटामधून त्यांनी प्रमुख भूमिका साकारली.

-Ads-

फेब्रुवारी २०१२ मध्ये अभिनेते रितेश देशमुख यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या लई भारी चित्रपटाद्वारे जेनेलिया यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
10 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)