Happy Friendship Day  …(प्रभात open house)

फ्रेंडशिप डे तसा रोजच असतो, कारण मित्र मैत्रिणी हे आपल्या नेहमी सोबत असतात. त्याच्यासमोर मुखवटा घालावा लागत नाहीत. घरच्यापेक्षा जास्त सिक्रेट किंबहुना फ्रेंड्स ना माहित असतात. त्यामुळे फ्रेंडशिप डे ला वेगळा असा मस्का मारून त्या मैत्रीला एक सलाम करायचा असतो.

मित्र बनायला तसं फारसं qualification लागते असं नाही. तुम्ही मित्र बनवताना मुळात स्वार्थ बाळगून मैत्री करत नसता. विचार जुळले नाही जुळले तरी मैत्री होते आणि ती टिकते ही… काही वर्षानंतर ही तुम्ही मित्राला भेटलात तरी जुन्या मैत्री प्रमाणेच तुम्ही एकमेकांशी वागत असता.

-Ads-

तुमच्या मित्राचा मित्र तुमचा मित्र नक्कीच बनतो. आणि नंतर मधला मित्र बाजूला राहून तुमच्या दोघांचे भटकंतीचे प्लॅन ठरतात, एकमेकांकडून नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. बरं यामध्ये मधल्या मित्राला कधी राग येत नाही. तो उलट क्रेडिट घेत असतो, माझ्यामुळे तुम्ही एकमेकांना ज्ञान वाटताय. मैत्री हे असं नातं आहे जिथे मत्सर, द्वेष, घृणा या भावनांना काही थारा नसतो. असतो ते फक्त विश्वास आणि प्रेम…

इतर नात्याप्रमाणे मैत्रीतही भांडणं होतात. पण ती तितकी मनावर घेतली नाही जात. २ दिवसानंतर त्याच फ्रेंडची खेचायला तुम्हीच पुढे असता. तुम्हीही तुमच्या रुसल्या फुगल्या मित्र मैत्रिणींना मनवा आणि हा फ्रेंडशिप डे साजरा करा.

 

– प्रशांत खोत, नवी मुंबई 

What is your reaction?
18 :thumbsup:
2 :heart:
1 :joy:
2 :heart_eyes:
7 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)