#HBD राहुल द्रविड : जाणून घ्या ‘द वॉल’च्या खास 10 गोष्टी

भारतीय क्रिकेटमध्येच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्येही आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे ‘द वॉल’ राहुल द्रविड. राहुल द्रविडचा आज ४६ वा वाढदिवस साजरा होत आहे. राहुल द्रविडने १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत तंत्रशुद्ध, संयमी आणि शांत खेळीने क्रिकेट जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

– ११ जानेवारी १९७३ साली मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये एका मराठी कुटुंबात राहुल द्रविडचा जन्म झाला. राहुलच्या जन्मानंतर त्याचे कुटुंब कर्नाटकात स्थायिक झाले. राहुलची मातृभाषा मराठी आहे. राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात १० हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने आपला उत्तम खेळ केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

– राहुल द्रविडचे वडील किसान जॅमच्या फॅक्टरीत नोकरी करत होते. यामुळे राहुलला जॅमी हे टोपणनाव पडले. नंतर राहुल किसान जॅमच्या जाहिरातीतही झळकला होता.

– राहुल द्रविडला हॉकी खेळाचीही अतिशय आवड होती. त्याची कर्नाटक राज्य ज्युनिअर हॉकी संघामध्ये निवडही झाली होती. राहुल द्रविड राज्यस्तरीय हॉकी खेळाडू राहिलेला आहे.

– राहुलला द वॉलसह जॅमी आणि मिस्टर डिपेन्डेबल या नावांनीही ओळखले जाते.

– राहुल द्रविडने लॉर्ड्समध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून  क्रिकेटविश्वात पदार्पण केले होते. यावेळी त्याने ९५ धावा केल्या होत्या.

– सलग चार कसोटी सामन्यात शतक झळकाविणारा राहुल एकमेव भारतीय खेळाडू आहे.

– २०१२ मध्ये कैनबरामध्ये ब्रैडमैन ओरेशन देण्यात आलेला राहुल हा पहिला बिगर-ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला होता.

– १९९९ च्या विश्वचषकात द्रविडने ४६१ धावा केल्या होत्या. २००० मध्ये विजडन क्रिकेटर्सने  वर्षभरातल्या पाच सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून राहुलला नामांकित केले होते.

– नोव्हेंबर २००३ मध्ये राहुलने आपल्या कामगिरीत आणखी एक विक्रम जोडला. त्याने न्यूझीलंडविरुद्ध केवळ २२ चेंडूंमध्ये ५५ धावा केल्या. यामुळे अजित आगरकर याच्यानंतर राहुल हा दुसरा सर्वात वेगवान एकदिवसीय अर्धशतक करणारा खेळाडू ठरला.

– राहुल आपली मैत्रीण विजेता पेंढारकर हिच्या प्रेमात पडला. आणि २००३ साली राहुल विजेतासोबत विवाहबंधनात अडकला. त्यांना समित आणि अन्वय नावाची दोन मुले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)