#HBD ‘द डॉन’

क्रिकेटमधील सार्वकालीन महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा आज जन्मदिवस आहे. खेळपट्टीवर टिकून फलंदाजी करण्याची आणि मोठी धावसंख्या उभा करण्याची जबरदस्त क्षमता सर डॉन ब्रॅडमन यांच्याकडे होती. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटमध्ये जो दबदबा आहे त्यांची उभारणी करण्यात ब्रॅडमन यांचा मोठा वाट आहे.  आज त्यांच्या ११० व्या जयंतीवर गूगलने स्पेशल डुडल बनवून त्यांना मानवंदना दिली.

सर दोन ब्रॅडमन हे ‘द डॉन’ या नावाने देखील ओळखले जात असत. त्यांच्या कसोटी कारकिर्दीची एकूण सरासरी ९९. ९४ इतकी आहे. आजपर्यंत अन्य कोणताही फलंदाज त्यांच्या कामगिरीच्या जवळपास देखील जाऊ शकला नाही.

-Ads-

त्यांच्या कारकिर्दीच्या आकडेवारीवर जरी नजर टाकली तरी त्यांचे श्रेष्ठत्व सहज लक्षात येईल. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५२ कसोटी सामन्यात ८० डावात फलंदाजी करताना ९९.९४ च्या सरासरीने ६,९९६ धावा केल्या आहेत. आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या कसोटीमध्ये त्यांना आपली सरासरी १०० करण्यासाठी फक्त ४ धावांची गरज होती परंतु ते शून्यावर बाद झाले. घरेलू क्रिकेटमध्ये त्यांनी ९५. १४च्या सरासरीने २८,०६७ धाव काढल्या. त्यात त्यांची सर्वोच्च धावसंख्या  ४५२ नाबाद होती.

या सार्वकालीन महान फलंदाजाचा मृत्यू २५ फेब्रुवारी २००१ला झाला. या महान फलंदाजास दैनिक प्रभातच्यावतीने या लेखाद्वारे मानवंदना !!!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)