#HBD : मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

बॉलिवूडमध्ये चॉकलेट हिरो म्हणून एंट्री करणारे रितेश देशमुखचा आज ४० वा वाढदिवस. रितेशचा जन्म एका राजकीय कुटुंबात झाला. परंतु, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याऐवजी रितेश कलाकारांच्या दुनियेत रममाण झाला. बॉलिवूडमध्ये रितेश देशमुखने १५ वर्ष पूर्ण केली आहेत.

लातूरमधील बाभळगावमध्ये १७ डिसेंबर १९७८रोजी रितेश देशमुखाचा जन्म झाला. रितेशने कृषी क्षेत्रात शिक्षण पूर्ण केले. एवढेच नाहीतर त्याने प्रदेशात जाऊन त्याची प्रॅक्टिसही केली होती. ‘तुझे मेरी कसम’द्वारे रितेशने २००३ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात जेनेलिया डिसुझा मुख्य भूमिकेत होती. मस्ती (२००४) चित्रपटामुळे रितेशच्या करियरला कलाटणी मिळाली. यानंतर क्‍या कूल है हम, ब्लफमास्टर, मालामाल विकली, हे बेबी, धमाल, दे ताली, हाउसफुल, तेरे नाल लव हो गया, हाउसफुल २, ग्रॅंड मस्ती आदी यशस्वी चित्रपट दिले. याशिवाय आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत रितेशने ‘एक व्हिलन’ या चित्रपटात व्हिलनची दमदार भूमिकाही वठवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केवळ हिंदीच नव्हे तर ‘लय भारी’ या मराठी चित्रपटातही  रितेशने दमदार भूमिका केली आहे. यानंतर सध्या रितेशचा दुसरा मराठी चित्रपट ‘माऊली’ रिलीज झाला असून प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. याव्यतिक्त रितेशने ‘बालक-पालक’ या चित्रपटाची निर्मितीही केली होती.

दरम्यान, तुझे मेरी कसम चित्रपटातील जेनेलिया डिसुझा हिला रितेशने पत्नी म्हणून पसंत केले. २०१२मध्ये हिंदू व ख्रिश्चन या दोन्ही रितीरिवाजानुसार रितेश आणि जेनेलियाचा विवाह पार पडला. या दोघांना आता दोन मुलेही आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)