Happy Birthday Kangana ; कंगनाने स्वत:ला दिले ‘हे’ खास गिफ्ट

बॉलीवूड क्वीन कंगना राणावत आज ३१वा वाढदिवस साजरा करत आहे. कंगनाचा हा बर्थडे जरा वेगळ्या स्वरुपात सेलिब्रेट होत आहे. ती मुंबईपासून दूर आपले जन्मगाव असलेल्या मनालीमध्ये वाढदिवस साजरा करतेय. काही दिवसांपूर्वीच तिने मनालीमध्ये घर घेतले. त्यानंतर आपल्या वाढदिवशी कंगनाने खास गिफ्ट स्वत:ला दिले आहे.

तिने स्वत:ला ३१ झाडे गिफ्ट केली आहेत. कंगना आपला ३१वा वाढदिवस मनालीमध्ये आपले कुटुंब आणि जवळच्या मित्रपरिवारासोबत साजरा करत आहे. कंगनाची बहिण रंगोलीने ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये कंगना झाडे लावताना दिसत आहे. रंगोलीने हा फोटो शेअर करताना म्हटलंय, आपल्या वाढदिवसाला आमच्या क्वीनने हिरवेगार प्लॅनेट तयार केले आहे. तुला दीर्घायुषी मिळो.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)