#HBD केन विलियम्सन

सध्या क्रिकेट वर्तुळात चार दादा फलंदाज राज्य करताहेत. त्यांना अनेक क्रीडा समालोचक ‘फॅब फोर’ म्हणून देखील संबोधतात. ते म्हणजे विराट कोहली, स्टिव्ह स्मिथ, जो रुट आणि केन विलियम्सन. न्यूझीलॅंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन याचा आज जमन्दिवस आहे.

न्यूझीलॅंड संघात नेहमीच खूप मोठे खेळाडू राहिले आहेत.  सर  रिचर हॅडली, ऍलन टर्नर, मार्टिन क्रोव हे त्यांचे महान खेळाडू.  स्टिफन फ्लेमिंग, ब्रेंडॉन मॅककुलम, डॅनिएल व्हिटोरी हे नजीकच्या काळातील  महान खेळाडू. सध्याच्या संघात पूर्ण विश्वास टाकावा असा एकही खेळाडू नसताना अनुभवी रॉस टेलरसमवेत केन विलियम्सन  न्यूझीलॅंड संघाची धुरा यशस्वीपणे सांभाळतो आहे.
न्यूझीलॅंड संघातीळ फलंदाज हे नेहमीच उत्तुंग षटकार खेचणारे खेळाडू म्हणून पुढे येतात. त्याला कारण तेथील वातावरण आणि संस्कृतीदेखील आहे. परंतु केन विलियम्सन हा खूप तांत्रिक खेळाडू आहे. क्रिकेटच्या पुस्तकातील सर्व फलंदाजीचे नियम गिरवून तो फलंदाजी करतो. तो क्वचितच हवेत फटका खेळतो. त्याच्यातील नेतृत्व गुण  हे दुसरे बलस्थान आहे. आपल्या खेळाडूंच्या पाठीशी उभे राहणे त्याचा स्वभाव गुण  आहे.
कसोटी क्रिकेट फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत  केन विलियम्सन  चौथ्या स्थानावर आहे तर एकदिवसीय फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत तो सध्या नवव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलॅंड संघाची धुरा उत्तमरीत्या सांभाळत असणाऱ्या केन विलियम्सन याला जन्मदिनाच्या शुभेच्छा!!!

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)