#व्हिडिओ: हॅप्पी बर्थडे दिलीप प्रभावळकर सर…  

जसा हिंदी चित्रपट म्हंटलं की “बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना” हा आयकॉनिक डायलॉग आठवतो तसाच मराठी सिनेमा म्हंटलं की प्रभावळकरांचा “ओम भट स्वाहा…” हा डायलॉग आठवल्या शिवाय राहत नाही…  
‘झपाटलेला’ या चित्रपटाचा पहिलाच सिन, इन्सपेक्टरच्या भूमिकेत असलेला महेश कोठारे कुख्यात गुंड तात्या विंचूच्या भूमिकेत असलेल्या दिलीप प्रभावळकरांवर हल्ला चढवतो. पोलिसांच्या हल्ल्यात तात्या विंचूला (दिलीप प्रभावळकर) गोळी लागते. अखेरचे श्वास मोजणारा तात्या विंचू मांत्रिकाने दिलेला मंत्र बाहुल्याच्या छातीवर हात ठेऊन ‘ओम भट स्वाहा…’ म्हणतो आणि भावल्याच्या शरीरात प्रवेश करतो. तात्या विंचूचे खलनायकी पात्र असो किंवा लगे रहो मुन्नाभाई मध्ये संजय दत्तला अहिंसेचे धडे देणारे गांधीजी असोत प्रभावळकरांनी जमीन-आस्मानाच विरोधाभास असणारी ही पात्रे नैपुण्याने साकारली.   मराठी आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपट सृष्टींमध्ये ज्या मोजक्या अभिनेत्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली त्यांच्यामध्ये दिलीप प्रभावलकरांचं स्थान अग्रणी आहे.
केवळ चित्रपटातचं नव्हे तर लेखन, नाटकांमधील अभिनय, दूरदर्शन मालिका या क्षेत्रांमध्ये देखील प्रभावळकरांचे मोठे योगदान आहे. एका फार्मा कंपनीतील नोकरदार ते जेष्ठ अभिनेता असा प्रभावळकरांचा प्रवास थक्क करणारा आहे. जैवभौतिक शास्त्रात पदवीत्तर शिक्षण घेतलेल्या प्रभावळकरांनी नाटकाच्या माध्यमातून कलाक्षेत्रात आगमन केल्यानंतर आपल्या नौकरीकडे पाठ फिरवली. एका मागून एका नाटकांमध्ये वेगवेगल्या घडणीची पात्रे साकारत त्यांनी आपल्याअंगी असलेले अभिनय नैपुण्य प्रेक्षकांपुढे मांडले. प्रभावळकरांच्या ‘नातीगोती’, ‘वासूची-सासू’, ‘संध्याछाया’, ‘जावई माझा भला’ इत्यादी नाटकांमधील भूमिकांना प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. पुढे त्यांनी छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. टिपरे-आबा म्हणून प्रभावळकर घराघरात पोहोचले. अपना अपना स्टाईल, गुब्बारें, छोटा मूँह और बडी बात, या हिंदी मालिकांमध्ये देखील प्रभावळकरांच्या भूमिका आहेत.
चित्रपट, लेखन, छोट्या पडद्यावरील भूमिका, नाटकं अशा विविध कला क्षेत्रांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या एका अष्टपैलू अभिनेत्यास दैनिक प्रभात कडून ७४व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्क्रिप्ट: प्रशांत शिंदे 
VO: अमोल कचरे

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)