#व्हिडीओ: HBD : अक्षय कुमारच्या बाबतीत काही मनोरंजक गोष्टी

बाॅलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार 9 सप्टेंबर रोजी 51 वा वाढदिवस साजरा करणार आहे. अक्षय कुमार आज बाॅलीवूडमध्ये ज्या स्थानावर आहे, तिथे पोहचणं इतक सोप्प नाही. अक्षयने आपल करिअरच्या सुरूवातीस खूप मेहनत घेतली आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबदल काही मनोरंजक गोष्टी ज्या तुम्हाला कधाचित माहित नसतील.

‘अक्षय कुमार’ याचा जन्म 9 सप्टेंबर 1967 रोजी अमृतसरमध्ये झाला. त्याच खर नाव ‘राजीव हरीओम भाटिया’ असं आहे.

अक्षयने ‘सौगंध’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर हळुहळु अक्षय बाॅलीवूडचा स्टार होत गेला आणि त्याला एकावेळी अनेक चित्रपटाच्या आॅफर येऊ लागल्या.

साल 1994 मध्ये ‘अक्षय कुमार’ याचे 11 चित्रपट प्रदर्शित झाले होते. एेलान, ये दिल्लगी,जय किशन, मोहरा, मैं खिलाड़ी तू अनाड़ी, इक्के पे इक्का, अमानत, सुहाग, जख्मी दिल, जालिम, हम हैं बेमिसाल अशी त्या चित्रपटाची नावे होय.

गैरसमजूतीमुळे सुटलं होत विमान

अक्षयला माॅडेलिंग बरोबरच चित्रपटात काम करयाच होतं. यासाठी त्याला चित्रपट निर्मात्यांच्या आॅफिसबाहेर सतत फेऱ्यासुध्दा माराव्या लागल्या. एकदा त्याला बेंगलूरूला एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी जायचं होतं. त्याच्या विमानाची वेळ सकाळी होती पण त्याला वाटल की सायंकाळी विमानाची वेळ आहे. या गैरसमजूतीमुळे त्याचा विमानप्रवास चुकला. यानंतर त्याला खूप दुख झालं आणि तो टाईमपास करण्यासाठी निघून गेला. फिरता-फिरता तो चित्रपट निर्मात्यांच्या आॅफिसजवळ पोहचलां, तिथं त्याची भेट प्रमोद चक्रवर्ती याच्यांशी झाली आणि त्याला दीदार या चित्रपटात अभिनेता म्हणून भूमिका मिळाली.

कारमधूनच सासूला करतो नमस्कार

अक्षयच्या बाबतीत एक मोठी गोष्ट आहे. माध्यमांच्या रिपोर्टनुसार जेव्हा केव्हा अक्षय त्याच्या सासूच्या म्हणजेच डिंपल कपाडिया यांच्या घरासमोरून जातो, तेव्हा तो फोन करून खिडकीमध्ये येण्यास सांगतो आणि कारमधूनच त्यांना नमस्कार करून पुढे निघून जातो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
20 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)