यष्टीरक्षकाच्या भूमिकेसाठी हैंड्‌सकांब इच्छुक

नवी दिल्ली: पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात यष्टीरक्षकांची भूमिका पार पाडून सर्वांना चकित करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या पीटर हैंड्‌सकांब क्रिकेट कॉम एयू शी बोलतानाने म्हटले आहे की, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षकांची भूमिका निभाविण्यासाठी मी इच्छुक आहे आणि ही अतिरिक्त कामगिरी पाहता यासाठी मी माझ्या फिटनेसवर काम करण्यासाठी तयार आहे. हैंडसकांबला विशाखापट्टनममध्ये भारताविरूध्दच्या पहिल्या टी20 सामन्यात नियमित यष्टीरक्षक एलेक्‍स कैरीऐवजी प्राधान्य देण्यात आले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विश्वचषक संघात हैंडसकांबची संधी मिळण्याची शक्‍यता वाढली आहे.

हैंड्‌सकांबने म्हणाला की, मी यष्टीरक्षकाची भुमिका पार पाडू शकतो, त्यासाठी मला माझ्यावर फिटनेसवर लक्ष द्यावे लागेल. ज्यामुळे 50 षटकांच्या सामन्यात प्रथम क्षेत्ररक्षण केल्यानंतर चौथ्या किंवा पाचव्या क्रमाकांवर खेळण्यासाठी मी मैदानावर उतरू शकेल आणि मैदानावर वेगाने धावू शकेल आणि संघासाठी चांगली कामगिरी करू शकेल.
क्ष्‌ टी- 20 खेळात सर्व निर्णय हे तातडीने घेत खेळ करावा लागतो. विशेषकरून भारतामध्ये उष्ण वातावरणात आणि फिरकीसाठी अनुकूल खेळपट्टीवर विकेटच्या अधिक जवळ उभे रहावे लागते. असे करणे हे थोड कठीण असू शकते पण मी यासाठी तयार असल्याचे हैंड्‌सकांबने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक कैरीचे पाच एकदिवसीय मालिकेसाठी संघात पुनरागमन होण्याची शक्‍यता आहे, मात्र हैंडसकांब संधी मिळाली तर पूर्ण दौऱ्यात यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडण्यासाठी तयार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हैंडसकांबने 2017 मध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेच्या दरम्यान सहायक प्रशिक्षक आणि विश्वकप विजेता संघाचा यष्टीरक्षक ब्रैड हैडिन यांच्यासोबत काम केले होते आणि त्याने आपल्या यष्टीरक्षकाच्या कामगिरीत झालेल्या सुधारणाचे श्रेय ब्रैड हैडिन यांना दिले आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी20 क्रिकेट सामन्यात भारताचा तीन विकेटने पराभव केला होता. त्यानंतर दुसरा टी20 सामना बुधवारी बेंगलुरूमध्ये होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)