हमीद अन्सारी याची पाकिस्तानी कारागृहातून सुटका

इस्लामाबाद: हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानात अटक करण्यात आलेला भारतीय नागरीक हमीद निहाल अन्सारी याची आज पाकिस्तानच्या कारागृहातून सुटका करण्यात आली. तीन वर्षांच्या कारावासाची त्याची शिक्षा पुर्ण झाल्यानंतर त्याला आज कारागृहातून सोडण्यात आले. 33 वर्षीय अन्सारी हा मुंबईचा रहिवासी आहे याला पाकिस्तानातील पेशावर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.

भारतीय नागरीक असला तरी त्याने पाकिस्तानी नागरीक असल्याचे भासवण्यासाठी खोटा पासपोर्ट त्याने तयार केला होता. तो भारतीय हेर असल्याचे त्याने मान्य केले होते असे पाकिस्तानी अधिकाऱ्याचे म्हणणे होते. तथापी तो फेसबुकद्वारे झालेल्या आपल्या मैत्रीणीला भेटण्यासाठी पाकिस्तानी हद्दीत गेला होता असे सांगण्यात येते. 15 डिसेंबरलाच त्याची शिक्षा संपली होती पण त्याच्याकडे आवश्‍यक ती कागदपत्रे नसल्याने त्याची कारागृहातून सुटका होऊ शकली नव्हती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)