अर्धा किलोमीटर चालत मोदींनी केले केदारनाथचे दर्शन

केदारनाथ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या जवानांसोबत भेट घेऊन मोदी केदारनाथ येथे पोहचले. 2014 मध्ये पंतप्रधान बनल्यानंतर नरेंद्र मोदींचे हा तिसरा केदारनाथ दौरा आहे. केदारनाथ येथे हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर त्यांनी पुढील अर्धा किलोमीटरच्या प्रवास पायी चालत केला. केदारनाथ मंदिरात पूजा, जलाभिषेक केला.

जून २०१३मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या आपत्तीमुळे संपूर्ण केदारनाथ घाट नष्ट झाला होता, या घटने संदर्भात तेथे प्रदर्शनाचे आयोजन केले आहे येथे मोदींनी भेट दिली, त्याचबरोबर आपत्तीनंतर मंदिराच्या निर्मितीबाबत माहिती घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोदी यांनी केदारनाथपासून ४०० मीटर उंचावरील ध्यान गुफेचे (मेडीटेशन केव्ह) लोकार्पण केले . ध्यान गुफा पाच मीटर लांब आणि तीन मीटर रुंद आहे. एकावेळी एका व्यक्तीला योग आणि ध्यान-धारणा करता येणार आहे. टेलिफोन, पाणी, वीज आणि स्वच्छतागृह आदी सोयी सुविधांयुक्त ही गुफा असणार आहे. या गुफेच्या प्रसिद्धीसाठी जिल्हा प्रशासन सोशल मीडियावर मोहीम राबवणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)