घोरपडी ते सासवड स्थानकांदरम्यान साडेपाच तासांचा ब्लॉक 

पुणे – मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने घोरपडी ते सासवड स्थानकांदरम्यान सब-वेच्या कामानिमित्त दि. 13 रोजी 5 तास 30 मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. सातारा स्थानकातून पहाटे 4 वाजून 30 मिनिटांनी पुण्याकडे येणारी गाडी सातारा ते जेजुरी मार्गावर धावणार आहे.

जेजुरी ते पुणे स्थानकापर्यंत गाडी रद्द करण्यात आली आहे. सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी सुटणारी पुणे-कोल्हापूर पॅसेंजर पुणे ते जेजुरीदरम्यान रद्द केली आहे. ही गाडी जेजुरी स्थानकातून नियोजित वेळेनुसार अर्थात सकाळी 11 वाजून 6 मिनिटांनी सुटणार आहे. निजामुद्दीन-यशवंतपूर एक्‍स्प्रेस घोरपडी येथे सुमारे 2 तास 20 मिनिटे थांबणार आहे. तर मुंबई-कोल्हापूर कोयना एक्‍स्प्रेस घोरपडी येथे सुमारे 1 तास 5 मिनिटे थांबणार आहे. कोल्हापूर-पुणे पॅसेंजर आळंदी स्थानकात सुमारे 30 मिनिटे थांबणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)