लोकपालसाठी अण्णांचा पुन्हा एल्गार

मुंबई: केंद्र सरकारने अजून लोकपाल नेमलेला नाही. जर केंद्राने इतक्‍यात लोकपालाची नेमणूक केली नाही तर आपण येत्या 30 जानेवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करू असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. हे उपोषण आपल्या राळेगण गावातच केले जाईल असे त्यांनी नमूद केले आहे. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांना लिहीलेल्या पत्रात त्यांनी हा ईशारा दिला आहे. हजारे यांनी म्हटले आहे की एनडीए सरकारने केंद्रीय पातळीवर लोकपाल आणि राज्यपातळीवर लोकायुक्तांच्या नेमणुकांबाबत कायमच चालढकल केली आहे.

लोकसभेत अधिकृत विरोधी पक्ष नेते नाहीत म्हणून लोकपालांची निवड करता येत नाहीत असे मोदी सरकार सुरूवातीला सांगत होते आणि आता त्यांनी योग्य कायदे तज्ज्ञ मिळत नाही म्हणून लोकपालांची नियुक्ती करता येत नाही असे कारण दिले आहे. आपल्या मार्च महिन्यातील रामलिलावरील उपोषणाच्यावेळी मोदी सरकारने लोकपालांची नियुक्ती केली जाईल असे लेखी आश्‍वासन दिले आहे याची आठवणही हजारे यांनी या पत्रात करून दिली आहे. त्यावेळी त्यांनी 2 ऑक्‍टोबर ही डेडलाईन दिली होती. तीही डेडलाईन त्यांनी चुकवली त्यावेळी आपण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांनी आपल्याला येऊन लोकपाल व लोकायुक्तांच्या निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आपण त्यांना 30 जानेवारी पर्यंत आणखी एक चान्स देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर आपले उपोषण सुरू होईल असेही त्यांनी म्हटले आहे. लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नियुक्तीची या सरकारची इच्छाच दिसत नाही असा आरोपही हजारे यांनी या पत्रात केला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)