हज फौंडेशनचे अध्यक्ष हाजी सिकंदर मणेर यांचे निधन

कोल्हापूर – तीस वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातून हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना हजमधील विधींचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे एकमेव प्रशिक्षक आणि हज फौंडेशन कोल्हापूरचे अध्यक्ष हाजी सिकंदर मणेर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर बागल चौक कबरस्थानमध्ये अंत्यविधी करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे-परतवंडे असा परिवार आहे.

तीस वर्षांपूर्वी हज यात्रेसाठी समुद्री मार्गाने जाणाऱ्या अकबरी जहाजातून प्रवास करणाऱ्या हज यात्रेकरूंना हज यात्रेत करण्यात येणारे सर्व विधी मुंबई येथे जाऊन शिकवण्यात हाजी सिकंदर मणेर यांचा महत्त्वाचा वाटा होता. कालांतराने जहाजातून करण्यात येणारी हज यात्रा सरकारी धोरणामुळे बंद झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातून हज यात्रेला हवाई मार्गाने जाणाऱ्या यात्रेकरूंना विधीवत हज यात्रेचे प्रशिक्षण देण्याला हाजी सिकंदर मणेर यांनी सुरुवात केली.

हाजी सिकंदर मणेर यांचे हे तीस वर्षे अखंड सुरू असलेले कार्य पाहून त्यांना केंद्रीय हज कमिटीने कोल्हापूर जिल्हा समन्वयक म्हणून नेमणूक केली होती. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या एरिगेशन विभागात नोकरीस असणारे मणेर हे सेवा निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हज यात्रेकरूंची सेवेसाठी हज फौंडेशन, कोल्हापूर या नोंदणीकृत संस्थेची स्थापना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)