पाकिस्तानने घातली हाफिज सईदच्या ‘जमात-उद्‌-दावा’ वर बंदी !

इस्लामाबाद: पाकिस्तानने गुरूवारी खतरनाक दहशतवादी हाफिज सईद याच्या जमात-उद्‌-दावा (जेयूडी) या संघटनेवर आणि फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन (एफआयएफ) या संस्थेवर बंदी घातली. पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यासाठी जागतिक दबाव आल्याने पाकिस्तानने संबंधित पाऊल उचलले.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षाविषयक बैठकीत जेयूडी आणि एफआयएफवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक असणाऱ्या हाफिजने समाजसेवेचे ढोंग करण्यासाठी जेयूडी आणि एफआयएफची स्थापना केली. त्यांच्या मार्फत शाळा, रूग्णालये, रूग्णवाहिका सेवा चालवल्या जातात. जेयूडी आणि एफआयएफचे मिळून सुमारे 50 हजार सदस्य आहेत. तसेच, शेकडों पगारी कामगार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/DDNewsHindi/status/1098600124660498433

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)