हडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक 

पाच गुन्हे उघड : 4 लाख 60 हजारांचा ऐवज जप्त 

पुणे – हडपसर पोलिसांनी सराईत चोरास अटक केली. त्याने पाच गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी चार गुन्हे वाहनचोरीचे, तर एक गुन्हा घरफोडीचा आहे. त्याच्याकडून दोन दुचाकी, दोन चारचाकी गाड्या आणि 21 ग्रॅम सोने आणि 144 ग्रॅम चांदी असा 4 लाख 60 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आली आहे.

पप्पुसिंग घागासिंग टाक (वय 23, रा. हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर चोरी, वाहन, जबरी चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांचेकडून विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. या मोहिमेत असताना पोलीस नाईक प्रताप गायकवाड, पोलीस शिपाई नितीन मुंढे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे टाक याला नुकतीचे अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, प्रसाद लोणारे, पोलीस हवालदार युसूफ पठाण, राजेश नवले, पोलीस नाईक प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, सैदोबा भोजराव, राजू वेगरे, गणेश दळवी, पोलीस शिपाई नितीन मुंढे, अकबर शेख, गोविंद चिवळे आणि शशिकांत नाळे यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)