जिम्नॅस्टिक विश्वचषक : जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने वॉल्ट स्पर्धेत पटकावले कांस्यपदक 

नवी दिल्ली – भारताची अव्वल जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने कलात्मक जिम्नॅस्टिक विश्वचषकातील वॉल्ट स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. जर्मनीतील कोटबस येथे सुरु असलेल्या विश्वचषकाच्या तिसऱ्या दिवशी दीपाने वॉल्ट स्पर्धेत 14.396  गुण मिळवत कांस्यपदक आपल्या नावे केले.

कलात्मक जिम्नॅस्टिक विश्वचषकातील वॉल्ट स्पर्धेत ब्राझीलच्या रिबेका एंड्रेडने सुवर्ण तर अमेरिकेच्या झेड कारे ने रौप्य पदक पटकावले आहे.

-Ads-

दरम्यान, दीपा कर्माकरला याच स्पर्धेतील तालबद्ध जिम्नॅस्टिक विश्‍वचषक स्पर्धेत बॅलेन्स बीम प्रकारात 23 व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)