घरांसमोर “गटारगंगा’

दापोडीतील चित्र : ड्रेनेज तुंबून आरोग्य धोक्‍यात

पिंपळे गुरव – ड्रेनेज तुंबून रस्त्यांचे नाले झाल्याचे चित्र दापोडीतील गुरवपट्टा चाळीत पहायला मिळत आहे. घरासमोरील ड्रेनेजचे पाणी आणि दुर्गंधी यामुळे येथील नागरिक हैराण झाल आहेत.
सततच्या पडणाऱ्या पावसामुळे एकीकडे बळीराजा सुखावला आहे. तर दुसरीकडे पाणी साठ्यात वाढ होत आहे. मात्र, दुसरीकडे महापालिकेच्या सांडपाणी निचरा व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. दापोडी तील रस्त्यांवरुन ड्रेनेजचे पाणी वाहत आहेत.

गुरव पट्टा चाळ परिसरात घरांसमोरच ड्रेनेजचे पाणी साचले आहे. काही घरांमध्ये हे पाणी शिरले आहे. मैला व दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. लहान मुलांना या पाण्यातून वाट काढत जाताना मळमळायला होते. पाऊस सुरू झाल्यापासून ही समस्या उद्‌भवली असताना महापालिकेचा आरोग्य विभाग निद्रीस्त अवस्थेत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. चाळीतील बहुसंख्य नागरिकांची पिण्याच्या पाण्याचे नळ दरवाजासमोर आहेत. तुंबलेल्या ड्रेनेजच्या पाण्यावरच पिण्याची भांडी ठेवून पाणी भरण्याची वेळ आली आहे. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी कमी होण्याऐवजी दिवसें-दिवस वाढत चालले आहे. त्यामुळे डासांसह किटकांचा उपद्रव वाढला असून साथीचे आजार फैलावण्याची भीती व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)