पत्रकार हत्येप्रकरणी गुरमीत राम रहीम दोषी

नवी दिल्ली – डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला ‘राम चंदर छत्रपती’ या पत्रकाराच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पंचकूलामध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. राम रहीमला दोषी ठरविल्यानंतर याप्रकरणी 17 जानेवारीला पुढील सुनावणी होणार असून या सुनावणीत त्याची शिक्षा निश्चित होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाबा रहीम सोबतच अन्य तीन आरोपींनादेखील या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. राम रहीम याच्याविरूध्दच्या सुनावणीदरम्यान आज हरियाणा आणि पंजाबमधील अनेक भागात सुरक्षेच्या कारणास्तव 144 कलम लागू करण्यात आला होता. बलात्कारप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेला राम रहीम याप्रकरणीही दोषी ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)