दक्षिणेकडे “गली बॉय’ चा रिमेक होणार

रणवीर सिंहचा”गली बॉय’ थिएटरवर एकदम हिट चालला आहे. “गली बॉय’ रिलीज होऊन चारच दिवस झाले आहेत. आतापर्यंत या सिनेमाने 72.45 कोटी रुपयांचा धंदा केला आहे. ही कमाई केवळ भारतातीलच आहे. अजून विदेशातील कमाईचे आकडे पुढे यायचे आहेत. ज्या वेगाने “गली बॉय’ची प्रगती चालली आहे, ते पाहता हा सिनेमा सहज 100 कोटींच्या क्‍लबमध्ये दाखल होईल, अशी खात्री व्यक्‍त केली जात आहे.

उत्पन्नाचे रेकॉर्ड करणाऱ्या या हिंदी सिनेमाचा आता दक्षिणेमध्ये रिमेकही करण्याची तयारीपण सुरु झाली आहे. मात्र अद्याप त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. अरविंद अल्लू हे “गली बॉय’चा तेलगू रिमेक करण्याच्या विचारात आहेत, असे समजले आहे. आतापर्यंतच्या तयारीनुसार रणवीर सिंहचा मेन लीड रोल दक्षिणेतील आघाडीचा अभिनेता साई धर्म तेज हा करणार असल्याची बातमी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“गली बॉय’च्या नावावर आतापर्यंत तीन रेकॉर्ड जमा झाले आहेत. दिग्दर्शक झोया अख्तर आणि आलिया भट यांचे सर्वाधिक ओपनिंग या सिनेमाला मिळाले आहे. रणवीर सिंहचा हा सलग तिसरा हिट सिनेमा आहे. आलिया आणि रणवीर यांचा हा पहिलाच एकत्र सिनेमा आहे. आता तेलगू “गली बॉय’ला देखील असाच प्रतिसाद मिळतो का ते बघूया/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)