कर्जफेडीसाठी फोडले एटीएम

गुजरातमधील दोन शेतकऱ्यांना पोलिसांकडून अटक

अहमदाबाद – गुजरातमधील सुरतमध्ये दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना या दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकजण अल्पवयीन आहे. या दोघांनी 10 लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. ही घटना गोडादरा येथील आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनगर सोसायटीमध्ये राहणारा प्रकाश धमैया नावाचा एक व्यक्ती मंगळवारी पहाटे एका अल्पवयीन तरुणासोबत गोडादरा येथील एसबीआयचे एटीएम फोडण्यासाठी गेला. त्यावेळी एटीएमच्या बाहेर सुरक्षारक्षक तैनात नव्हता. दोघेही एटीएमच्या आत गेले आणि एटीएमचे शटर बंद करून घेतले. त्यानंतर एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला आणि त्यांनी एटीएम फोडण्यास सुरुवात केली. मात्र, त्याचवेळी तेथून पेट्रोलिंगसाठी निघालेले पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी एटीएमजवळ येऊन पाहिले आणि त्या दोघांना रंगेहाथ पकडले.

दरम्यान, अटक करण्यात आलेले दोघेही शेतकरी कुटुंबातील आहेत. दोघांचीही स्वतःची जमीन आहे. मात्र, प्रकाशच्या वडिलांना टीबीसह अन्य आजार आहेत. त्यांच्या उपचारासाठी 10 लाखांहून जास्त रक्कम खर्च झाली. त्यासाठी प्रकाशने स्वतःची जमिन नातेवाईकाकडे गहाण टाकून कर्ज घेतले होते. हे कर्ज त्याला फेडायचे होते. त्यामुळे त्यांनी कर्जातून बाहेर पडण्यासाठी असे केले, असे त्यांचे म्हणणे आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)