गांधीनगर – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ऍनिमल एक्सचेंज कार्यक्रमांतर्गत मुंबई आणि पंजाबमध्ये सिंहाची एक-एक जोडी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. देशातील अन्य राज्यांना वन्य-प्राणी आणि पक्षी संपत्तीची माहिती व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.
गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती वाढत आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे. आगामी काळातही पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध योजना आखण्यात येत आहेत.