बनावट चकमक प्रकरणी गुजरातची याचिका फेटाळली; अहवाल गोपनीय ठेवणार नाही

नवी दिल्ली: देशभरात 2002 ते 2006 दरम्यान झालेल्या बनावट चकमकींच्या 24 प्रकरणांबाबत न्या. एच.एस. बेदी कमिटीने दिलेला अंतिम अहवाल गोपनीय राखण्याची विनंती करणारी गुजरात सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. हा अहवाल आता याचिकाकर्त्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. न्या. एच.एस.बेदी यांचा अहवाल मिळण्यासाठी गीतकार जावेद अख्तर यांच्यासह काही याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने ही मागणी मान्य केली.

जावेद अख्तर आणि ज्येष्ठ पत्रकार बी.जी. वर्गीस यांनी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला याची न्यायालयाने दखल घेतली आणि अहवालाच्या प्रती याचिकाकर्त्यांसह राज्य सरकारना देण्याचे आदेश दिले.

न्या. एच.बी. बेदी यांच्या कमिटीचा अहवाल सध्यातरी स्वीकारला किंवा नाकारला जाऊ शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)